पाण्याअभावी कर्नाळा अभयारण्यातील पक्ष्यांची तडफड

0
909

मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलनजिक असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यातील तीनही जलाशयं कोरडी पडल्याने अभयारण्यातील पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.अभयारण्यातील या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वन विभागाच्यावतीने 27 ठिकाणी पाण्याच्या कुंडया भरून ठेवण्यात आल्या असून त्यासाठी 7 वनमजुरांची व्यवस्था कऱण्यात आली आहे.मात्र 12 किलो मिटर परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात 27 पाण्याच्या कुंड्या अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे अभयाऱण्यात कायम स्वरूपी पाणी व्यवस्था केली जावी अशी मागणी पक्षी मित्र करीत आहेत.

कर्नाळा अभयाऱण्यात 134 प्रजातीचे स्थानिक तर 28 प्रजातीच्या स्थलांतरीत पक्ष्यांचे वास्वव्य असते.या सर्व पक्ष्यांची पाण्यासाठी तडफड चालू आहे.या अभयारण्यातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तसेच पक्षी निरिक्षणासाठी दररोज शेकडो पर्यटक कर्नाळ्याला भेट देत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here