पुण्यनगरी व तरुण भारत या वृत्तपत्रांचे कुडाळ तालुका जावली येथील पत्रकार वशिम शेख याना पाचगणी येथील दुभाष बाबा व त्याच्या 25 व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली .लॉक डाउन च्या काळात बेकायदा उत्खनन सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर शेख त्या ठिकाणी जाऊन त्याचे शूटिंग करत असताना त्यांना मारहाण झाली .या बाबत शेख यांनि पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सातारा जिल्हा पत्रकार संघाने या बाबत जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते याना पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा वापर करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .सातपुते यांनी ही पाचगणी पोलिसांना तशा सूचना दिल्या आहेत .या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून गुन्हेगारा ना तातडीने अटक करावी अशी आमची मागणी आहे
सातारा