पवारही माध्यमांवर घसरले…

0
789

माध्यमांतील बातमी अंगावर आली की,माध्यमाच्या विरोधात गळा काढण्याची राजकारण्यांची जुनी खोड आहे.आपल्या गैरसोयीची बातमी आली की,प्रसंगानुरूप माध्यमांना दोष देण्याच्या बाबतीत कोणताही नेता अपवाद नाही. शरद पवारांनी हेच केले.काल पवार यांनी सरकार टिकविण्याचा मक्ता आम्ही घेतलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले होते.पवारांच्या या वक्तव्यावर विश्लेषण करणे ,त्यांचा सतत विधाने बदलणारी भूमिका जनतेच्या नजरेस आणून देणे हे माध्यमांचे काम आहे..त्यानुसार इलेक्टॉनिक आणि प्रिन्ट मिडियातून यावर काल दिवसभर चर्चा झाली.सर्वच वाहिन्यांनी हाच विषय घेत चर्चा घडवून आणल्या. चर्चेवरील बहुतेक वक्त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेचा समाचार घेत काल स्थिर सरकारसाठी पाठिंबा देणारेआज सरकार अस्थिर करीत आहेत असा आरोप करीत शरद पवार जर पाठिंबा काढून घेणार असतील तर त्यामागची कारणं काय असू शकतात यावर चर्चा झाल्या.चर्चानंतर पवारांवर राज्यभर टिका झाली.हे प्रकरण अंगलट येतंय असं दिसताच पवारांनी आज आपल्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास क ेल्याचा आरोप करीत सरकार पाडण्याचा विचार नसल्याचं जाहीर केलं.सरकार पाडणार नसाल तर सरकार टिकविण्यााचा आम्ही मक्ता घेतला नाही या वक्तव्याचा काय अर्थ होऊ शकतो हे मात्र पवारांनी सांगितले नाही.वाहिन्यावर रात्रीच्या वेळेस चर्चा करणाऱ्या राजकीय विश्लेषकांवर पवारांचा विशेष राग दिसून आला.पवारांनी अशा पध्दतानं घुमजाव करणं हे त्यांच्या आजवरच्या स्वभावाशी सुसंगतच म्हणता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here