परिषदेचे 40 वे अधिवेशन पिपरी-चिंचवडला

  0
  875

  मुंबई- .मराठी पत्रकार परिषदेची महत्वाची बैठक काल मुंबईत झाली.त्यात काही महत्वाचे निर्णय़ घेतले गेले.पहिला म्हणजे घटनादुरूस्ती मसुद्याला काही दुरूस्त्या सुचवत परिषदेच्या कार्यकारिणीने संमती दिली.दुसरा महत्वाचा निर्णय घेतला गेला तो परिषदेचे 40 वे अधिवेशन पिंपरी-चिंचवड येथे घेण्याचा 6 आणि 7 जुलै रोजी हे अधिवेशन होईल.तिसरा निर्णय़ झाला,परिषदेच्या तालुका अध्यक्षांचा मेळावा 22 फेब्रुवारी रोजी अलिबाग येथे घेण्याबाबत.परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस परिषदेचे माजी अध्यक्ष कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे,सरचिटणीस संतोष पवार,कोषाध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,जेथे अधिवेशन होतंय त्या पिंपरी चिचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बापुसाहेब गोरे आणि जवळपास 22 जिल्हयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.परिषदचे कार्य ग्रामीण भागापर्यत पोहोचलेले आहेच पण ते अधिक प्रभावी व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या मसुद्याचं उपस्थितांनी स्वागत करीत ही घटना अमंलात आल्यास परिषदेचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होईल अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here