रायगड जिल्हयातील पहिल्या पनवेल महापालिकेच्या निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला असून न्यायालयाच्या आदेशानुसार पनवेल नगरपालिका तसेच सिडकोच्या हद्दीतील 21 आणि एमएमआरडीएच्या हद्दीतील 11 गावांसह पनवेल महापालिका अस्तित्वात येत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निर्मितीच्या अंतिम अधिसूचनेस मान्यता दिली आहे.सरकारने दोन महिन्यापूर्वीच पनवेल नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर कऱण्याचा निर्णय घेतला होता.मात्र नगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू झाल्याने निवडणूक आयोगाने त्याला हरकत घेतली होती.त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते.निवडणूक आयोगाने न्यायालयात आठ दिवसात महापालिकेबाबतची अधिसूचना निघाल्यास हरकत नाही अशी भूमिका घेतली होती.त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी अंतिम अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे.त्यामुळे आता महापालिका अस्तित्वात येत आहे.मात्र नयना प्रकल्पात येणारी 36 गावे नव्या महापालिकेतून वगळण्यात आली आहेत-