उरणचे पनवेलचे आमदार विवेक पाटील शिवसेनेत जाणार अशी बातमी आजच्या मुंबई सकाळमध्ये प्रसिध्द झाल्याने संतप्प झालेल्या विवेक पाटील समर्थकांनी आज सकाळी दैनिक सकाळची होळी केली.
आमदार जयंत पाटील यांनी शिवसेनेशी युती तोडून पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत चर्चा अशी आहे की,ही भूमिका विवेक पाटील तसेच शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांना मान्य नव्हती.त्यामुळे ते नाराज होते.त्यातून अशी बातमी आल्याने आज पनवेलमध्ये खळबळ उडाली.या अगोदरही एकदा विवेक पाटील राष्ट्रवादीत जाणार अशी बातमी प्रसिध्द झाली होती.त्यानंतर सागर दैनिकाच्या कार्यालयावर शेकाप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.
सकाळने बातमीसोबत विवेक पाटील आणि बाळाराम पाटील यांची प्रतिक्रियाही प्रसिद्ध केली असून असा कोणताही नि र्णय आम्ही घेणार नाही आम्ही शेकापमध्येच शेवटपर्यत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .सकाळने दोन्ही बाजू मांडल्या असतानाही संतप्त शेकाप कार्यकर्त्यांनी आज अंकाची होळी केली.( बातमी बरोबरचे चित्र संग्रहातले आहे )