पनवेलचे कॉग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज आमदारकीचा राजीनामा मुंबईत विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केला आहे.येत्या विधानसभेची निवडणूक आपण लढविणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केल्याने रायगडमधील राजकीय समीकरणं बदलणार आहेत.
मुबई-पनवेल रस्त्यावर खारघर-कामोठे येथे नव्यानेच टोलनाका उभारण्यात आला आहे.या टोलमधून एम.एच.46 आणि एम.एच.-6 क्रमांकाच्या स्थानिक वाहनांना टोलमधून सवलत मिळावी अशी मागणी प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती.मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही दिले होते.मात्र गेली दोन महिने यासंदर्भात सरकारने कोणतीच ठोस भूमिका न घेतल्याच्या निषेधार्थ आमदार ठाकूर यांनी हा राजीनामा दिला आहे.आ.ठाकूर यांच्या पाठोपाठ पनवेल तालुक्यातील कॉग्रेसचे अन्य पदाधिकारी देखील सामुहिक राजीनामे देणार आहेत.
प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर भाजपच्या संपर्कात असून ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा सध्या जिल्हयात सुरू आङे.

LEAVE A REPLY