पनवेल विधानसभा मतदार संघातून शेकापतर्फे बाळाराम पाटील यांची उमेदवारी पक्षाने काल जाहीर केली आहे.पनवेल येथे झालेल्या एका कार्यक्रमात पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी बाळाराम पाटलांच्या नावाची घोषणा केली.राजकीय पक्षाने विधानसभेसाठी एखादा उमेदवार जाहीर करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.
बाळाराम पाटील यांनी 2009मध्ये पनवेलची विधानसभा लढविली होती.मात्र तेथे त्यांना कॉग्रेसचे प्रशांत ठाकूर यांनी पराभूत केेले होते.आता पुन्हा एकदा प्रशांत ठाकूर विरूध्द बाळाराम पाटील अशी लढत होईल.
दरम्यान निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह वाटपातील निकष बदलले आहेत.त्यानुषार पूर्वी जे मान्यता प्राप्त पक्ष होते,अशा पक्षाचे चिन्ह गोठविले गेले असेल तर त्यांनी ते मागणी केल्यास त्यांना परत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निकषानुसार शेकापने खटारा या चिन्हाची मागणी केली होती.त्यानुसार शेकापला हे चिन्ह दिले गेले आहे.निवडणूक आयोगाने तसे पत्र पाठविल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.राज्यातील सर्व मतदार संघात आता शेकापला खटारा वापरता येणार आहे.