पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर हल्ला 

0
720

उस्मानाबाद येथील उस्मानाबाद लाइव्हचे संपादक आणि दैनिक गावकरीचे प्रतिनिधी सुनील ढेपे यांच्यावर उस्मानाबाद येथील एका मटका किंगने हल्ला केला आहे.गावकरीच्या कार्यालयात जाऊन केलेल्या या हल्ल्यात गावकरीच्या कार्यालयाचीही मोट्या प्रमाणात मोडतोड झाल्याचे वृत्त आहे.या हल्ल्यात ढेपे यांना चांगलीच दुखापत झाली आहे.वरिष्ठ osmanacadपोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळास भेट दिली आहे.पोलिसांनी सुनील ढेपेंचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले आहे.पोलिसानी ढेपेंचा मोबाईल बंद केल्याचे समजते त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही.
‘कारागृहात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न ,पोलिसांची आरोपींबरोबर अर्थपूर्ण बोलणी’ या मथळ्याखाली 4 सप्टेंबरच्या गावकरीमध्ये ढेपे यांनी बातमी दिली होती.त्याचा राग मनात धरून हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे.. आनंदनगर भागात राजरोस मटका सुरू असताना पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत. असा उल्लेख संबंधित बातमीत होता.हे देखील हल्ल्यामागचे एक कारण असू शकते
.दरम्यान या हल्ल्य्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेने तीव्र शब्दात धिक्कार केला असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here