ब्रिजेश सिंग नवे माहिती सचिव,मुख्यमंत्र्यांचा योग्य निर्णय

0
640

ब्रिजेश सिंग यांच्याकडील नव्या जबाबदारीचे स्वागत 

माहिती आणि जनसंपर्क विभागाचे कर्तव्यकठोर महासंचालक ब्रिजेश सिंग यांच्याकडे आता सचिव पदाचा अतिरिक्त कारभारही असणार आहे.तीन महिन्यापूर्वी ब्रिजेश सिंग यांनी महासंचालक म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून सचिव पदाचा काऱभार कोणाकडे जाणार ? याबाबत उत्सुकता होती.आजपर्यंत सचिव पदाचा कारभार मनिषा म्हैसकर यांच्याकडे होता.महासंचालक आणि सचिवपदाचा कारभार एकाच व्यक्तीकडे आल्याने माहिती आणि जनसंपर्कचा कार्याला वेग येईल.कारण महासंचालकांकडून वर गेलेल्या अनेक फाईल्स सचिवांकडे पडून असत त्यामुळे निर्णयच होत नव्हते.पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्‍न असेल ,पत्रकार संरक्षण कायद्याचा विषय असेल ,पत्रकार आरोग्य योजनेबाबतचे अनेक निर्णय प्रलंबित होते.अधिस्वीकृती समितीच्याबाबतीतही अनक निर्णय घेणे अपेक्षित असताना ते प्रलंबित ठेवण्याकडेच सचिवालयचा कल होता.त्यामुळे विभागाबद्दल पत्रकारांच्या मनात मोठी नाराजीची भावना दिसून येत होती.ब्रिजेश सिंग यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर विभागात अनेक सकारात्मक बदल होताना दिसत आहेत.विभागातील अधिकार्‍यांची मनमानी ,गटबाजीला ब्रिजेश सिंग यांनी चाप लावल्याने विभागात शिस्त दिसायला लागली आहे.

वस्तुतः ब्रिजेश सिंग यांची नियुक्ती झाल्यानंतर एक आयपीएस अधिकारी या विभागाचा महासंचालक झाल्यानंतर महासंचालनालय पोलीस कमिशनरच्या कार्यालयासारखे होईल म्हणून आम्ही त्यास विरोध केला होता.मात्र या विभागाल शिस्त लावण्यासाठी एक आयपीएसच हवा होता हे आता सिध्द झाले आहे.महासंचालक आणि सचिवपद ब्रिजेश सिंग यांच्याकडे आल्याने आता पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्‍नांबद्दल वेगाने निर्णय घेतले जातील असा विश्‍वास पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या नव्या निर्णयाचे परिषदेने स्वागत केले आहे.ब्रिजेश सिंग यांचे मनापासून अभिनंदन– 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here