कोल्हापुरात पत्रकार शिबिर

0
1238

पत्रकार संरक्षण कायद्याच्या जनजागृतीसाठी प्रथमच कोल्हापूरमध्ये पत्रकार संरक्षण कायदा जागृती शिबिराचे आयोजन कऱण्यात आले आहे.कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे.या कार्यकमास प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असून पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी गेली बारा वर्षे लढा देणारे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक आणि मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख आणि विश्‍वस्त किरण नाईक प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार,विशेष पोलीस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील,विभागीय सचिव समीर देशपांडे यांची उपस्थिती असणार आहे.या कार्यक्रमास जिल्हयातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चारूदत्त जोशी परिषद प्रतिनिधी विठ्टल पाटील,डिस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे आणि उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी केले आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here