शिवराज्याभिषेक सोहळा आनंदात संपन्न 

0
1044
 

अखिल भारतीय शिवरज्याभिषेक महोत्सव समितीतफ र्े 344 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज जय शिवाजी,जय भवानीच्या जयघोषात संपन्न झाला.दुर्गराज किल्ले रायगडावर संपन्न झालेल्या या सोहळ्यास शिवरायांचे तेरावे  वंशज छत्रपती संभाजी राजे उपस्थित होते.राज्यभरातून आलेल्या हजारो शिवभक्त यावेळी गडावर उपस्थित होते.यावेळी मैदानी खेळांची प्रात्यक्षिके कऱण्यात आली.मुख्य सोहळ्यापुर्वी सकाळी नगरखान्यासमोरील ध्वजस्तंभावर भगवा ध्वज फडकविण्यातआला.अभिषेकाच्या मुख्य सोहळ्यानंतर पारंपारिक लवाजम्यासह शिवछत्रपती,जिजाऊ याच्या पालखी मिरवणुका काढण्यात आल्या.शिवसमाधी पुजनाने पालखी सोहळ्याची सांगता झाली,शिवभक्तांच्या गर्दीने गेली दोन दिवस रायगड गजबजून गेला आहे.भगवे फेटे घातलेले हजारो शिवभक्त रायगडावर उपस्थित आहेत.

मुख्य सोहळ्यात बोलताना छत्रपती संभाजी राजे म्हणाले की,अरबी समुद्रात शिवरायाचे स्मारक होत असले तरी शिवरायांचे जिवंत स्मारक असलेली गडकिल्ले जतन करण्याचे काम प्रथम झाले पाहिजे.रायगडाच्या संवर्धनासाठी शिवभक्तांनी वर्षातून किमान दोन वेळ ाश्रमदान केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांचेही भाषण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here