राज्यातील पत्रकारांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या पत्रकार पेन्शन योजनेचा विषय येत्या अधिवेशनात मार्गी लावला जाईल असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या नागपूर येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात आपल्या प्रास्ताविकात देशमुख यांनी पेन्शनचा प्रश्‍न मार्गी लावण्याची विनंती केली.तसे निवेदनही मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांना देण्यात आले.त्यानंतर एस.एम.देशमुख यांच्याशी बोलताना राज्यातील पत्रकारांना पेन्शन योजना नक्कीच लागू केली जाईल असे आश्‍वासन त्यांनी दिले.पत्रकार कोणाला म्हणायचे याची व्याख्या पत्रकार संरक्षण कायद्यात करण्यात आली आहे.ती व्याख्या प्रमाण माणून राज्यातील पत्रकारांना सरसकट आरोग्य योजनेचा लाभ मिळावा अशी विनंती देशमुख यांनी केली.त्यावरही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पत्रकारांचे अन्य प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात पत्रकारांचे अनेक विषय मार्गी लागतील अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here