प्रशांत कांबळे प्रकरणी मुख्यमंत्री लक्ष घालणार

0
1420

नागपूर दिनांक 25 ( प्रतिनिधी) अमरावती येथील पत्रकार प्रशांत कांबळे यांच्यावर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची आणि त्यांच्यावर दाखल कऱण्यात आलेल्या खोटया गुन्हयांचा अहवाल मागवून योगय ती कारवाई करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांचे काल नागपूरमध्ये भव्य समारंभात वितरण करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ,पालकमंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे,महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यावेळी उपस्थित होते.यावेळी एस.एम.देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकात या घटनेचा उल्लेख करून प्रशांत कांबळे यांना टॉर्चर करणार्‍या आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.तसे लेखी निवेदनही मुख्यमंत्र्यांना परिषदेच्यावतीने देण्यात आले आहे.पत्रकारांवर दाखल होणार्‍या खोटया गुन्हयांना आवर घालायचा असेल तर पत्रकाराच्या विरोधात तक्रार आल्यास त्याची वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत शहानिशा करूनच तो दाखल केला जावा अशी मागणीही एस.एम.देशमुख यांनी आपल्या भाषणात केली आहे.

महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसात सात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. त्यात पुसदचे दीपक हरिमकर,उदगीरचे निवृत्ती जवळे आणि अन्य दोन पत्रकार,आष्टी येथील दादासाहेब बन आणि शरद रेडेकर,सातारा येथील विशाल कदम आणि जालना येथील मधुकर सहाने आदि  पत्रकारांचा समावेश आहे.खोटे गुन्हे दाखल केले गेल्याने त्याची राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेने देखील यापुर्वीच मुख्यमंत्र्यांना मेल वरून निवेदन पाठविले होते तसेच अमरावती,बुलढाणा,अकोला येथील परिषदेशी संलग्न जिल्हा संघांनी एसपी आणि कलेक्टरांना निवेदने देऊन या प्रकाराची चौकशी करण्याची विनंती केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here