वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीच्या बिलाची वारंवार मागणी करूनही ती न देणाऱ्या कॉग्रेसच्या एका माजी पदाधिकाऱ्याने वैजापूर तालुक्यातील गारज येथील पत्रकार बाबासाहेब पवार यांना यांना मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.धमकी देणाऱ्या पुढाऱ्याचं नाव निवृत्ती मच्छिंद्र बारसे असे असून तो कॉग्रेस सेवा दलाचा माजी अध्यक्ष होता.बारसे यांनी पवार यांना गेल्या वर्षी दहा हजारांची जाहिरात दिली होती.जाहिरातीची रक्कम वर्तमानपत्राच्या कार्यालयात जमा करा असे पवार यांनी वारंवार बारसे यांना सांगूनही त्यांनी ती रक्कम जमा केली नाही.उलटपक्षी फोनकरून माझे जाहिरातीबरोबर दिलेले फोटो परत कर नाही तर तुला पाहून घेईन अशी धमकी सोमवारी सकाळी दहा वाजता दिली.बाबासाहेब पवार यांनी शिऊर पोलिसात याबाबत तक्रार दिली असून आरोपीविरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.