राष्ट्रवादीच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुणेः एखादी बातमी छापली नाही,आपल्याला हवी तशी बातमी दिली नाही किंवा आपल्या विरोधात बातमी आली की,राष्ट्रवादीचे नेते सोशल मिडियावरून जोरदार आदळ-आपट करीत असतात.पत्रकारांना धमक्या देणं,त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरणे,त्यांची अर्वाच्च भाषेत निर्भत्सना करणं हे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून सातत्यानं घडत असतं. मात्र आता ही मंडळी एवढयावरच थांबली नाही तर पत्रकारांच्या कुटुंबियांबद्दलही अश्‍लील भाषा वापरून आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवत असतात.अशाच एका पत्रकाराच्या पत्नीबद्दल अश्‍लील भाषा वापरल्याबद्दल राष्ट्रवादीच्या तिघा कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोहसिन शेख,महादेव बालगुडे आणि सचिन कुंभार अशी या कार्यकर्त्याची नावं आहेत.पत्रकार कृष्णा वर्पे यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल झाले आहेत.
कृष्णा वर्पे यांनी दिलेल्या तक्रारीन्वये मोहसिन शेख याने काही दिवसांपुर्वी वर्पे यांना फोन करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.आणि ऑफिसचा पत्ता विचारून धमकावले होते.अन्य दोघे महादेव बालगुडे आणि सचिन कुंभार यांनी पत्रकाराच्या पत्नी विषयी सोशल मिडियावरून आक्षेपार्ह लिखाण केले.गेले काही दिवस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कृष्णा वर्पे यांना त्रास दिला जात होता.मात्र कृष्णा वर्पे यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं मात्र पत्नीच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे त्यानी पोलिसात तक्रार दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here