सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकारः अतूल कुलकर्णी

0
8378

बीड येथील महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी,कृषीमित्र अतूल कुलकर्णी यांचा आज अंबाजोगाई येथे कै.त्र्यंबक आसरडोहकर स्मृती पत्रकारिता पुरस्काराने सन्मान करण्यात आला.या पुरस्काराचे ते हक्कदार आहेत असं मला वाटतं.कारण ग्रामीण भागाशी नाळ जुडलेला,शेती विषयाचा चांगला अभ्यास असणारा,आणि सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करणारा हा एक पत्रकार आहे.बीड जिल्हयातील आणि एकूणच मराठवाडयातील सामाजिक,शेती विषयक प्रश्‍नांची चांगली माहिती असलेल्या अतूल कुलकर्णी यांनी आपल्या लेखणीतून जिल्हयातील प्रश्‍नांना वाचा फोडली आणि सामांन्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.शेती विषयाचे ते अभ्यासकच नाहीत तर शेतीत वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी दुष्काळी बीड जिल्हयातही शेती किफायतशीर होऊ शकते हे दाखवून दिले आहे.पाणी आणि पर्यावरणाच्या क्षेत्रातही त्यांनी चांगले काम केले आहे.अशा सार्‍या विषयावर ते सातत्यानं लिखाणही करीत असतात.पत्रकारितेबद्दल हल्ली अनेकजण अनेक पध्दतीनं बोलत असतात.मात्र अतूलकडं पाहिल्यानंतर सारं संपलेलं नाही याची जाणीव दिलासा देत असते.एक मितभाषी,सचोटीनं पत्रकारिता करणारा,सामाजिक विषयांत रस असलेला पत्रकार म्हणून अतूल कुलकर्णी मराठवाडयात सुपरिचित आहेत.त्यांचा उशिरा का होईना सन्मान झाला ही आमच्यासारख्या त्यांच्यावर प्रेम करणार्‍यांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे.अतूल कुलकर्णी यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here