महाराष्ट्रात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याच्या घटना सातत्यानं घडत आहेत.अशा 32 घटनांची माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे उपलब्ध झालेली असली तरी त्यांची संख्या मोठी आहे.खोटे गुन्हे दाखल केल्याने पत्रकारांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ येते.पुण्यातील लाईट ऑफ पुणे या साप्ताहिकाचे संपादक रूबेन म्यॅन्युअल अशा षडयंत्राचे ताजे बळी आहेत.त्यांच्यावर खंडणी आणि अन्य विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल केले गेलेले आहेत.त्यांनी पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या फॅशन स्टॅ्रीटवरील अतिक्रमणं आणि हातगाडीवाल्यांच्या विरोधात मोहिम उघडलेली होती.त्यामुळे हे सारे त्याच्याविरोधात संतापलेलेच होते.त्यातून त्यांच्या आणि त्यांच्या बंधूच्या विरोधात खंडणीच्या खोटया तक्रारी दाखल केल्या गेल्या.अशा काही तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर तडीपारीची नोटीस बजावली आहे.रूबेन यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना वारंवार भेटून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची दखल कोणीच घेत नसल्याने नैराश्याने ग्रासलेल्या रूबेन यांनी 26 नोव्हेंबर 2015 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.यामध्ये रूबेन 60 टक्के भाजले असून त्यांच्यावर ससूनमध्ये उपचार करण्यात आले.पत्रकारांवर गुन्हे दाखल करताना त्या गुन्हयात किती तथ्य आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.– पत्रकाराने स्वतःला पेटवून घेतले