नागोठणेकरांनी रात्र जागून काढली

0
931

खालापुरात एकजण वाहून गेला
रायगड जिल्हयात गेले चार दिवस कोसळत असलेल्या पावसाचा जोर आज सकाळी काही अंशी कमी झाला असला तरी काल दिवसभर आणि रात्री जिल्हयात सवर्त्र जोरदार पाऊस झाला.पावसामुळे जिल्हयातील सवर्च नद्यांना पूर आले असून अंबा नदीचे पाणी रात्री नागोठण्यात घुसले आहे.आजही गावातील माकेर्ट,कोळी वाडा,भाजी माकेर्ट,तसेच स्टॅन्ड परिसर पाण्याखाली आहे.रात्रीची भरती,जोरदार पावसाने सातत्यानं वाढत जाणारी पाणी पातळी,त्यातच वीज पुरवठा बंद झाल्याने नागोठणेकरांनी कालची रात्र जागूनच काढली.व्यापारी आणि नागरिकांनी अगोदरच पाण्याचा अंदाज घेऊन सामानांची आवरा-आवर केल्याने मोठे नुकसान झाले नाही.
रोह्यातील कुंडलिका नदीलाही पूर आलेला आहे,भिरा घरणाचे तीन दरवाजे उङडल्याने रोहा तसेच दमखंडी भागातील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्हयातील सावित्री,काळ,पाताळगंगा,गाढी,उल्हास या नद्यांनाही पूर आले असून पनवेल शहर जलमय झाले आहे.खालापूर,खोपोलीतही पाणी घुसले आहे.खालापूर नजिक आडोशी येथील एक व्यक्ती अोढ्याच्या पाण्यात वाहून गेला आहे.
चार दिवस सतत कोसळत असलेल्या पावसाने २८ पैकी २४ धरणं तुडुंब भरली अाहेत.काल एका दिवसात रोहा तालुक्यात २२० मिली मिटर एवढे विक्रमी पाऊस झाला आहे.येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वतर्विल्याने जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.माथेरानमध्ये २३० मिली मिटर एवढा विक्रमी पाऊस झाल्याने माथेरानचे जनजीवन विस्कळित झाले आहे.जिल्ह.याक आज सकाळी संपलेल्या २४ तासात सरासरी ९७-६६ मिली मिटर पाईस झाला आहे.आतापयर्त जिल्हयात १५६२.६० मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here