लोकसभेत एकही पत्रकार नाही

0
679

सोळाव्या लोकसभेतील एकही खासदार पत्रकार नाही,हे वास्तव आता समोर आलं आहे.निवडणुकी पुवीर् उमेदवारी अजर् भरताना कोणत्या खासदाराचा काय व्यवसाय आहे याची माहिती आता समोर आलीय.लोकसभेतील सवार्धिक खासदार हे शेतकऱ्यांची मुलं आहेत.( तरीही शेतकरी आत्महत्या करताहेत ही गोष्ट वेगळी) याशिवाय अनेकजण सामाजिक कायर्कतेर् आहेत.वकिल आहेत.डाॅक्टर आहेत.व्यावसियिक आहेत.मात्र कोणी पत्रकार नाही.याचा अथर् पत्रकारांना कोणताही राजकीय पक्ष उमेदवारी देत नाही किंवा उमेदवारी दिली तरी ते निवडून येत नाहीत असा काढता येतो.यावेळेस आप पक्षाने अनेक पत्रकारांना संधी दिली होती पण ते पराभूत झाले.
लोकसभेतील १४३ खासदार शेतकरी आहेत,नेरंद्र मोदी यांच्यासह ८७ खासदार हे सामाजिक कायर्कतेर् आहेत,३६ खासदार राजकीय कायर्कतेर् आहेत,५४ खासदार वकिल आहेत,२६ खासदार डाॅक्टर आहेत, ७२ खासदार व्यावसायिक आहेत.नरेंद्र मोदींनी आपण सामाजिक कायर्कतेर् असल्याचे म्हटले आहे,सोनिया गांधींनी राजकीय कायर्कतेर् असल्याचे सांगितले आहे,तर राहूल गांधी यांनी आपला व्यवसाय धोरण विषयक सल्लागार असल्याचा दाखविला आहे.सुषमा स्वराज आणि लोकसभाध्यक्षा सुनित्रा महाजन यांनी आपण वकिल असल्याचे आपल्या उमेदवारी अजार्त नमुद केले आहे.पत्रकारांना उमेदवारी देऊन हातात विस्तव घेण्याची कोणाचीही तयारी हे यातून दिसते.राज्यसभेत किंवा राज्ायंच्या विधान परिषदेत पत्रकारांना पाठविले जावे असा संकेत असताना तेथेही अभावानेच पत्रकारांचे प्रतिनिधी दिसतात.थोडक्यात पत्रकारांना सवर्स्तारावर टाळणयाचाच प्रयत्न होतोय.त्यामुळे अनकांना असं वाटतं की,पत्रकारांसाटी वेगळा मतदार संघ असावा (शिक्षक,पदवीधऱ सारखा ) या कोटयाला माझा मात्र विरोध आहे.लोकसभेत किंवा राज्यांच्या विधानसभेत आणि वरच्यासभागृहातही कोणी पत्रकार नसल्यानं सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडं लक्ष देत नाही.बातम्यांसाठी पत्रकारांचा वापर करणारे राजकारणी देखील पत्रकारांचे प्रश्न सभागृहात उठवताना दिसत नाहीत.त्यामुळे कायदा असो,पेन्शन असो नाही तर मजिठिया अमंलबजावणीचा असा कोणतेच प्रश्न सुटत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here