रायगडमध्ये दीड लाख पर्यटक येणार 

0
755
नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा रायगड जिल्हयातील विविध पर्यटन स्थळांवर दीड लाख पेक्षा जास्त पर्यटक येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.31 डिसेंबरसाठी जिल्हयातील बहुतेक हॉटेल्स,वाडया,लॉजचे बुकिंग यापुर्वीच फुल्ल झाले आहे.अनेक ठिकाणी कॅशलेसची व्यवस्था झाल्याने नोटबंदीचा नववर्ष स्वागताला फारसा फटका बसणार नाही असा अंदाज व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.रायगड जिल्हयात अलिबाग,किहिम,वरसोली,मांडवा,काशिद,मुरूड,दिवेअगर,हरिहरेश्‍वर,श्रीवर्धन हे समुद्र किनारे,पाली, महड,हरिहरेश्‍वर,कनकेश्‍वर ही धार्मिक स्थळे,रायगड,जंजिरा,कुलाबा यांसह 32 किल्ले आणि माथेरानसारखे पर्यटन स्थलं आहे.या सर्व ठिकाणी 31 डिसेंबरला पर्यटक गर्दी करतात.या काळात जिल्हयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र पोलिस बंदोबस्त असणार ओ.तसंच मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर देखील जिल्हा प्रशासनाचे करडी नजर असणार आहे..-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here