नगर प्रेस क्लबची सामाजिक बांधिलकी

0
1019

जलयुक्‍त’ च्‍या कामात सहभागी होऊन नगर प्रेस क्‍लबने जपला जांभेकरांचा वारसा- जि‍ल्‍हाधि‍कारी कवडे
अहमदनगर, दि‍नांक 17- जलयुक्‍त शि‍वार अभि‍यानासाठी नगर प्रेस क्‍लबच्‍या वतीने देण्‍यात आलेली आर्थि‍क मदत हा केवळ जि‍ल्‍ह्यासाठीच नव्‍हे तर राज्‍यासाठी दि‍शादर्शी उपक्रम असून आचार्य बाळशास्‍त्री जांभेकरांचा वारसा जपण्‍याचे नगर प्रेस क्‍लबचे कार्य गौरवास्‍पद आहे, असे उद्गार जि‍ल्‍हाधि‍कारी अनि‍ल कवडे यांनी काढले. आचार्य बाळशास्‍त्री जांभेकरांच्‍या पुण्‍यति‍थीनि‍मि‍त्‍त नगर तालुक्‍यातील अकोळनेर येथे प्रेस क्‍लबच्‍यावतीने आयोजि‍त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि‍ल्‍हा अधीक्षक कृषि‍ अधि‍कारी भाऊसाहेब ब-हाटे, जि‍ल्‍हा माहि‍ती अधि‍कारी राजेंद्र सरग, तालुका पंचायत समि‍तीचे सभापती संदेश कार्ले, सरपंच सवि‍ता मेहेत्रे, माजी खासदार दादा पाटील शेळके, तालुका कृषि‍ अधि‍कारी बाळासाहेब नि‍तनवरे, संग्राम भि‍न्‍गारदि‍वे, माजी सभापती नंदा शेंडगे ‍ प्रेस क्‍लबचे अध्‍यक्ष मन्‍सूर शेख, महेश देशपांडे महाराज, सागर शि‍न्‍दे, आमीर सय्यद, मकरंद घोडके, वाजीद शेख, समीर मन्‍यार, शब्‍बीर सय्यद, जुनेद शेख,सोमनाथ मैड, यतीन कांबळे, उपस्‍थि‍त होते.
जि‍ल्‍हाधि‍कारी कवडे म्‍हणाले, सध्‍याची टंचाई परि‍स्‍थि‍ती पहाता जलयुक्‍त शि‍वार अभि‍यान हे एक प्रकारे वरदान ठरणार आहे. या कामामध्‍ये प्रत्‍येकाने योगदान द्यायला हवे. अकोळनेरवासि‍यांनी सुरु केलेल्‍या जलयुक्‍त शि‍वार अभि‍यानाच्‍या कामामध्‍ये पत्रकारांचा थेट सहयोग हा सर्वांना प्रेरणादायी आहे. वृत्‍तपत्रे, दूरचि‍त्रवाहि‍न्‍याच्‍या माध्‍यमातून पत्रकार नेहमीच प्रगल्‍भतेने लोकप्रबोधन करीत असतात. न्‍याय-अन्‍याय व्‍यवस्‍थेच्‍या पटलावर मांडतांनाच समाजमन घडवि‍ण्‍याचे कामही पत्रकारि‍ता करते. सामाजि‍क लोकोद्धाराच्‍या कामात सक्रि‍य सहभाग नोंदवून पत्रकारांनी आचार्य बाळशास्‍त्री जांभेकरांना आगळी वेगळी आदरांजली अर्पण केल्‍याचे त्‍यांनी सांगि‍तले. जलयुक्‍त शि‍वार अभि‍यानामुळे आगामी काळात फायदा होणार असून जलसंवर्धन, मृदसंधारण, पाण्‍याची बचत, कमी पाण्‍यात अधि‍क उत्‍पादन देणारी पि‍के घेणे, ठीबक सि‍न्‍चनाचा वापर या गोष्‍टींचा अवलंब गावक-यांनी स्‍वयंस्‍फूर्तीने करावा, असे आवाहन त्‍यांनी केले.
प्रारंभी जि‍ल्‍हाधि‍कारी कवडे यांनी गावक-यांनी लोकसहभागातून सुरु केलेल्‍या वाळुंबा नदीखोलीकरणाच्‍या कामाची पहाणी केली. या कामात अकोळनेरवासि‍यांनी दि‍लेल्‍या योगदानाबाबतही त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. त्‍यानंतर तेथेच आयोजि‍त कार्यक्रमात प्रारंभी आचार्य बाळशास्‍त्री जांभेकरांच्‍या प्रति‍मेस जि‍ल्‍हाधि‍कारी अनि‍ल कवडे यांनी पुष्‍पहार अर्पण करुन अभि‍वादन केले. प्रास्‍तावि‍क महेश देशपांडे महाराज यांनी केले. यावेळी त्‍यांनी प्रेस क्‍लबच्‍या वतीने आयोजि‍त करण्‍यात येत असलेल्‍या वि‍वि‍ध उपक्रमांची माहि‍ती दि‍ली.
यावेळी जि‍ल्‍हा अधीक्षक कृषि‍ अधि‍कारी भाऊसाहेब ब-हाटे, जि‍ल्‍हा माहि‍ती अधि‍कारी राजेंद्र सरग, तालुका पंचायत समि‍तीचे सभापती संदेश कार्ले, माजी खासदार दादा पाटील शेळके यांनीही समयोचि‍त मनोगत व्‍यक्‍त करतांना प्रेस क्‍लबच्‍या सामाजि‍क उपक्रमाबद्दल कौतुक केले.
गाव पाणीदार व शि‍वार हि‍रवेगार व्‍हावे म्‍हणून शासनाच्‍या सहयोगाने अकोळनेर वासि‍याने सुरु केलेल्‍या जलयुक्‍त शि‍वार अभि‍यानाच्‍या या कामास नगर प्रेस क्‍लबच्‍या वतीने अकरा हजार रुपयांचा नि‍धी जि‍ल्‍हाधि‍कारी अनि‍ल कवडे यांनी गावक-यांकडे सुपूर्द केला. शेवटी सागर शि‍न्‍दे यांनी आभार मानले.
फोटो ओळी- 1) अकोळनेर येथे प्रेस क्‍लबच्‍या वतीने आयोजि‍त आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पुण्‍यति‍थी कार्यक्रमात जि‍ल्‍हाधि‍कारी अनि‍ल कवडे यांनी प्रेस क्‍लबचे अध्‍यक्ष मन्‍सूर शेख व गावक-यांसमवेत वाळुंबा नदीखोलीकरणाच्‍या कामाची पहाणी केली. यावेळी जि‍ल्‍हा अधीक्षक कृषि‍ अधि‍कारी भाऊसाहेब ब-हाटे, जि‍ल्‍हा माहि‍ती अधि‍कारी राजेंद्र सरग, तालुका पंचायत समि‍तीचे सभापती संदेश कार्ले, महेश देशपांडे महाराज आणि‍ इतर ( छाया वाजीद शेख)
फोटो ओळी- 2) अकोळनेर येथे प्रेस क्‍लबच्‍या वतीने आयोजि‍त आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पुण्‍यति‍थी कार्यक्रमात जि‍ल्‍हाधि‍कारी अनि‍ल कवडे यांच्‍या हस्‍ते जलयुक्‍त अभि‍यानासाठी सरपंच सवि‍ता मेहेत्रे यांच्‍याकडे नि‍धी सूपूर्द करण्‍यात आला. यावेळी प्रेस क्‍लबचे अध्‍यक्ष मन्‍सूर शेख जि‍ल्‍हा अधीक्षक कृषि‍ अधि‍कारी भाऊसाहेब ब-हाटे, जि‍ल्‍हा माहि‍ती अधि‍कारी राजेंद्र सरग, तालुका पंचायत समि‍तीचे सभापती संदेश कार्ले, महेश देशपांडे महाराज आणि‍ इतर ( छाया वाजीद शेख)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here