मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षांची मनमानी

0
886

मुंबईच्या पत्रकार भवनात काय॓क़म घेताय? मग पाहुणे देवदास मटाले यांना विचारूनच ठरवा अन्यथा…..

धर्मदाय आयुक्तांकडं नोंदविली गेलेली कोणतीही संस्था आणि त्या संस्थेची मालमत्ता विश्‍वस्त मंडळाच्या किंवा विश्‍वस्त मंडळातील विशिष्ट पदाधिकार्‍यांची बापजाद्यांची जहागीर नसते.ती मालमत्ता सार्वजनिक असते आणि विश्‍वस्त मंडळ हे त्यावर देखरेख ठेवत असते.मात्र अनेकदा विश्‍वस्त हे वास्तव विसरतात आणि आपल्या ताब्यातील संस्थेचा मनमानी पध्दतीनं वापर करीत राहतात.मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांची सध्या अशीच मनमानी सुरू आहे.पत्रकार भवनाचे दोन हॉल भाड्याने दिले जातात.जो भाडे भरेल त्याला हे हॉल उपलब्ध करून दिले जातात.त्यानुसार मराठवाड्यातील एक तरूण विलास गावस्कर यांनी आठ दिवसांपुर्वी रितसर 1700 रूपये भाडे भरून हॉल बुक केला होता.गावस्कर हे एक मासिक सुरू करणार आहेत.त्याच्या प्रकाशन कार्यक्रमासाठी त्यांनी हा हॉल बुक केला होता.डॉ.तात्यासाहेब लहाने यांच्या हस्ते मासिकाचं प्रकाशन होणार होतं आणि मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार होते. बुधवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 2.30 वाजता हा कार्यक्रम होणार होता.जेव्हा हॉल बुक केला गेला तेव्हा कोण पाहुणे आहेत याची विचारणा केली गेली नव्हती.आम्ही काल गावस्कर तयारीसाठी म्हणून पत्रकार संघात गेले तेव्हा पत्रिकेवरील एस.एम.देशमुख यांचे नाव पाहुण देवदास मटाले यांचे पित्त खवळले.अगोदर तेथील कर्मचार्‍याने गावस्कर यांना ‘या इसमाला’ ( एस.एम) यांना तुम्ही कार्यक्रमास बोलावले असल्याने तुमचं बुकींग आम्ही रद्द केले असल्याचे सांगितले.हे ऐकूण गावस्कर यांना धक्काच बसला .कारण पत्रिका वाटून झाल्या होत्या.तयारी झाली होती. ऐनवेळी जागा बदलणे अशक्य होते.त्यामुळं त्यांनी अध्यक्षांना भेटण्याचा आग्रह धरला.देवदास मटाले तेथेच होते.मात्र कर्मचारी तुम्हाला अध्यक्षांना भेटता येणार नाही असं वारंवार सांगत होता.तरीही गावस्कर अध्यक्षांकडं गेले आणि ‘माझं बुकींग रद्द का केलं गेलं त्याचं कारण मला लेखी द्या’ अशी मागणी करू लागले.त्यावर मटाले आवाज च ढवत ‘तुम्ही एस.एम.देशमुख यांना कसे काय पाहुणे म्हणून बोलावलं आहे? .त्याचं आमचं जमत नाही,ते सातत्यानं आमच्या विरोधात अपप्रचार करीत असतात (देशमुख काय अपप्रचार करतात ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जा) अशा माणसाला तुम्ही बोलावल्याने आम्ही तुमचं बुकींग रद्द केलं असल्याचं सांगितलं.हे सारं झाल्यावर गावस्कर यांनी देशमुख यांना फोन केला आणि मटाले असं बोलताहेत काय करू? अशी विचारणा त्यांनी केली.त्यावर ‘देशमुख यांनी ठीक आहे मी कार्यक्रमास येत नाही’ म्हणून मटालेंना सांगा आणि तुमचा कार्यक्रम पार पाडा असं सांगितलं.मात्र देशमुख येत नाहीत म्हटल्यावरही देशमुख यांना बोलावलचं कसं? आणि का? असा प्रश्‍न करीत मटाले यांनी बुकींग रद्द केलं आणि गावस्कर यांचे 1700 रूपये त्यांच्याकडे परत केले.त्यामुळं गावस्कर यांची फारच अडचण झाली.आता बोरीवलीत एका छोटया ठिकाणी त्याना आपला कार्यकम पार पाडावा लागत आहे.आज सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होईल.

पत्रकार भुवनात यापुर्वी वादग्रस्त व्यक्तीच्या पत्रकार परिषदा झालेल्या आहेत.त्यावरून वादंगही उठलेले आहे.देशमुख नक्षलवादी नाहीत की दहशतवादी नाहीत.व्यक्तिगत पातळीवर मटाले आणि देशमुख यांच्यात काही वाद असू शकतात.मात्र एखादया त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेने ठेवलेला काय॓क़म पाहुणे मटालेंचया मजी॓तले नाहीत म्हणून बुकींग कसं काय रद्द करू शकतात तेच समजते नाही.  प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बालवायचे हे काय मटाले यांना विचारून ठरवायचे काय ? ही अरेरावी झाली.आज पत्रकार संघाच्या  कार्यकारिणीची बैठक होत आहे या बैठकीत सदस्यांनी या संदंर्भात जाब विचारण्याची गरज आहे.

अर्थात देशमुख आणि मराठी पत्रकार परिषदेशी अशी अरेरावी कऱण्याची मटाले यांची ही पहिलीच वेळ नाही.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने आयोजित एक पत्रकार परिषदेसाठी अगोदर हॉल बुक केलेला होता.तीन वाजता पत्रकार परिषद होती.मात्र दीड वाजता मुंबई मराठी पत्रकार संघातून देशमुख आणि किरण नाईक यांना फोन आला आणि तुमचं बुकींग रद्द करण्यात आल्याचं सांगितलं.त्याचं कारणही दिलं गेलं नाही.बुकींग रद्द केल्यानंतर त्याचे जे पैसे जमा केले होते ते देखील संघानं परत दिलेले नाहीत.त्याच्या पावत्या आजही मराठी पत्रकार परिषदेकडे आहेत.

मुंबई मराठी पत्रकार संघात एक टोळकं संघाची पत आणि प्रतिष्ठाच लिलावात काढायलं निघालं आहे.त्यामुळं लिहिणारे पत्रकार  संघाकडे फिरकतही नाहीत.मुंबईच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात पत्रकार संघाचं मोठं योगदान होतं.सीमा प्रश्‍न असेल की,मराठी माणसाच्या, पत्रकारांच्या हिताचे अनेक लढे संघानं लढले आणि अनेकांना न्याय मिळवून दिला.पत्रकारांच्या चळवळीचं केंद्रबिंदु असलेले पत्रकार भवन आता रिकाम टेकड्यांचा अड्डा झालेला आहे असं खेदानं नमुद करावं लागतं.पत्रकार संघाचे आजही काही हितचिंतक आहेत,पत्रकार संघात जे घाणेरडे राजाकऱण चालते ते त्यांना मान्य नाही अशा ज्येष्टांनी एकत्र येत पत्रकार संघाच्या भवितव्याचा विचार करावा अशी विनंती आहे. कारण पत्रकार भवन मटाले यांची खासगी मालमत्ता नाही. ती मुंबईतील पत्रकारांची अस्मिता आहे. त्याकडे दुल॓क्ष होता कामा नये

(मराठी पत्रकार परिषद आणि एस.एम. ,किरण नाईक यांची पत्रकार संघाच्या कंपूला का भिती वाटते?,ते सात्तत्यानं त्यांच्या विरोधात का कारस्थानं करीत असतात? ,याचं कारण समजून घेण्यासाठी जिज्ञासुंनी जरूर खालील लिंकवर क्लीक करावी म्हणजे सारं वास्तव समोर येईल.तसेच मुंबई मराठी पत्रकार संघ तसेच मराठी पत्रकार परिषद यांच्यातही वाद काय आणि त्याच्या मुळाशी कशी ‘सुमार’ मंडळी आहे हे देखील समजून येईल.)

http://goo.gl/9WYo5m

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here