नगराध्यक्षांच्या निवडीसाठी हालचालीं

0
660
नगराध्यक्षांना देण्यात आलेली मुदतवाढ सरकारने मागे घेतल्याने रायगड जिल्हयातील नगरपालिकांच्या नगराध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.
जिल्हयातील बहुतेक नगरपालिकांच्या अध्यक्षाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे,त्यामुळे नगराध्यक्ष निवडीची अधिसूचना दोन दिवसात निघेल आणि जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात नवीन नगराध्यक्ष निवडले जातील अशी शक्यता आहे.रायगड जिल्हयात रोह्यात राष्ट्रवादी,पनवेलमध्ये कॉग्रेस,अलिबागमध्ये शेकापची एकहाती सत्ता असल्याने तेथे त्या त्या पक्षाचे नगराध्यक्ष होतील अशी शक्यता आहे..काही नगरपालिंकात विविध पक्षांची आघाडी सत्तेवर आहे.अलिबागमध्ये नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्याने तेथे शेकापचे प्रशांत नाईक नगराध्यक्ष होतील अशी चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here