नगरकर पत्रकार मित्रांचे आभार

0
967
नगर प्रेस क्लबच्यावतीनं आज माझा सत्कार करण्यात आला.नगरमधील बहुसंख्य पत्रकार माझे जवळचे स्नेही आहेत.त्या सर्वांनी मैत्रीच्या भावनेतून हा सत्कार केल्यानं त्यात स्वाभाविकपणे आपलेपणा,जिव्हाळा आणि भावनेचा ओलावा जाणवत होत.सारे मित्रच असल्यानं त्यांनी माझं ज्या पध्दतीनं गुणगाण केलं,त्यानं माझ्या डोळ्याच्या कडा ओलावून गेल्या.सर्वांचे मनापासून आभार.
नगर प्रेसचे अध्यक्ष मन्सूरभाई,विजयसिंह होलम आणि त्यांचे सहकारी नेहमीच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीबरोबर राहिलेले आहेत.प्रत्येक आंदोलनातील नगरकर पत्रकारांचा उत्सुर्फ सहभाग मला प्रेरणा आणि बळ देत आला आहे.समितीने कार्यक्रम दिल्यानंतर त्याची तातडीनं अंमलबजावणी कऱण्यातही प्रेस क्लब नेहमीच आघाडीवर राहिला आहे.’आमदारांची पत्रं मिळवा’ असं आवाहन केल्यानंतर नगरकर पत्रकारांनी लगेच आज तीन आमदारांची आणि एका खासदाराचे पाठिंबा पत्रं मिळवून कार्यक्रमातच माझ्या हाती दिलं.10 मार्च ला राज्यभर जोरदार आंदोलन करायचं ठरलं आहे.त्यावेळी देखील संपूर्ण नगर जिल्हयातील पत्रकार आपल्या पाठिशी राहतील असं आश्‍वासन मला दिलं गेलं.एवढंच नव्हे तर राहून गेलेला तालुका पत्रकार संघांच्या अध्यक्षांचा मेळावा एप्रिलच्या तिसर्‍या आठवडयात घ्यायची तयारीही प्रेस क्लबनं दाखविली आहे.त्याबद्दलही सर्वांचे आभार
थोडक्यात आजचा दिवस सर्व जुन्या-नव्या मित्रांच्या सहवासात आनंदात गेला.चळवळीस मिळत असलेला पाठिंबा पाहून सोबत असलेले शरद पाबळे देखील आनंदीत झाले. सरकारला आता कायदा आणि पेन्शनसाठी जास्त काळ चालढकल करता येणार नाही हे नक्की.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here