धमक्या देणारे आणखीही आहेत…

0
744

आम्हाला मत द्या नाहीतर तुम्हाला पाणी देणार नाही अशी धमकी अजित पवार यांनी दिली आहे.त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले आहेत.पण पाणी हा एकमेव मुद्दा नाही किंवा मतदारांना अशा धमक्या देणारे अजित पवार एकटेही पुढारी नाहीत.ही का्र्रग्रेस-राष्ट्रवादीची नेहमीची पध्दत आहे.ज्या भागात साखर कारखाने आहेत तिथले कारखानदार आम्हाला मतं दिली नाही तर तुमचा ऊस नेणार नाही अशी धमकी हमखास शेतकऱ्यांना देतात, आणि अशा धमक्या देत निवडणुकाही जिकंतात , दूध उत्पादक संघाचे चालकही असंच करतात.एका गावाला रस्ता नव्हता.तिथल्या लोकांनी रस्ता मागितला तर तुमच्या गावात फुलाला जास्त मतं मिळतात म्हणून तुमच्या गावाला रस्ता होऊ देणार नाही अशा धमक्या दिल्या जातात.एका गावातली तर एस.टी.बसही ते गाव आपल्याला मत देत नाही म्हणून बंद केली गेली .कॉग्रेस-राष्ट्रवादीवाल्याांनी अशा धमक्या देतच आपल्यावर दीर्घकाळ सत्ता गाजविली आहे.पण लक्षात असू द्या,अजित दादांचं काहीच होणार नाही.गुन्हाही दाखल होणार नाही,कारवाईही होणार नाही.सत्ता त्यांच्याकडंय.कोणाला तरी याविरोधात थेट न्यायालयातच जावं लागेल तरच काही झालं तर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here