पाकिस्तानी पत्रकार जखमी

0
754

पाकिस्तानमधील प्रसिध्द पत्रकार आणि जियो न्यूज चे संपादक हामिद मीर यांच्यावर आज कराची येथे जीवघणा हल्ला कऱण्यात आला.हामिद यांना कराची एअरपोर्टजवळच गोळ्या घातल्या गेल्या.त्यांच्या कंबरेखालच्या भागाला तीन गोळ्या लागल्या आङेत. बाईकवरून आलेल्या तिघांनी या गोळ्या झाडल्या.नंतर ते पसार झाले.त्यांना रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.यापुर्वी देखील त्याच्यावर हल्ला झालेला आहे. आपल्या चॅनलवरून कट्टरपंथीयांच्या विरोधात सातत्यानं बातम्या चालविणाऱ्या मीर यांना अनेक वेळा धमक्या आल्या होत्या मीर सातत्यानं तालिबानच्या निशाण्यावर राहिले आहेत.हामिद यांना रूगणालयात दाखल करण्यात आलं असून आता त्यांच्या प्रकृत्तीचा धोक टळल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here