रेल्वेला अपघात,15 ठार,50 जखमी

0
934

रायगड जिल्हयातील नागोठणे-रोहा स्थानका दरम्यान दि वा – सावंतवाडी प्रवासी गाडीचे इंजिनासह चार डबे रूळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात 15 ठार आणि पन्नास जण जखमी झाले आहेत.मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आज सकाळी साडेऩऊच्या सुमारास हा अपघात झाला.

सकाळी साडेसहा वाजता सावंतवाडीकडं जाणा़ऱ्या प्रवासी गाडीने दिवा स्थानक सोडले. नऊच्या सुमारास नागोठणे स्थानक सोडल्यानंतर भिसे खिंडीच्या तोंडावरच गाडीचे इंजिन आणि तीन डबे अचानक रूळावरून घसरले.अपघाताचे कारण नक्की समजू शकले नाही.अपघाताचे वृत्त समजताच जिल्हयाच्या विविध भागातून मदतीचा ओघ सुरू झाला.कुर्ल्याहून निघालेली रेल्वेचे मदत पथकही घटनास्थळी पोहचले असले तरी अपघात ज्या ठिकाणी झाला तो सारा जंगल परिसर असल्याने मदत कार्यात व्यत्यय येत आहे.रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे घटनास्थळी पोहोचले आहेत.
अपघातामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली आहे.या मार्गावरून दररोज 32 गाड्या धावत असतात.मात्र वाहतूक विस्कळीत झाल्याने ठिकाठिकाणी हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.मांडवी,नेत्रावती एक्स्पेस थांबविण्यात आल्या आङेत तर निजामुद्दीन एक्स्पेस खेडजवळ थांबविण्यात आली आङे.मंगला एक्स्पेस खेडवरून रत्नागिरीला वळवून ती पुणे मार्गे मुंबईकडे रवाना करण्यात आली आङे.
रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली असून गंभीर जखमींन 15 हजार तर किरकोळ जखमींना 5 हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे.जखमींना रोहा,नागोठणे,अलिबागला हलविण्यात आले आहे.गंभीर जखमींना मुंबईस हलविले गेले आहे.अलिकडं दोन दिवसात कोकण रेल्वे मार्गावर झालेला हा दुसरा अपघात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here