मुरूड नजिकच्या पद्मदुर्ग किल्ल्यावरील तोफेची चोरी उजेडात आल्यानंतर रायगड जिल्हयातील सर्वच किल्ल्यांवरील तोफांच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला.मात्र या तोफा संवर्धनासाठी आता काही शिवप्रेमी संस्थाच पुढाकार घेत असून श्री शिवप्रतिष्टान हिंदुस्थान या मुंबईतील संस्थेने रायगड किल्ल्यावरील महादरवाजाच्या उजवीकडील बुरूजावर मातीत गाडल्या गेलेल्या दोन तोफा शोधून त्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत..रायगड किल्ल्यावर 17 शिवकालिन तोफा असल्याचे उल्लेख दफ्तरात सापडतात.यातील काही तोफा मातीत गाडल्या गेल्या आहेत तर काही उन,पाऊस आणि वादळाचा मारा सहन करीत खराब झालेल्या आहेत.श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने या तोफांचे संवर्धन करण्याचे आवाहन केल्यानंतर डिसेंबरमध्ये 17 तोफा शोधून काढून त्या व्यवस्थित ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.महादरवाजा नजिकच्या बुरूजावर ज्या दोन तोफा सापडल्या त्या 80 टक्के जमिनीत गाडल्या गेलेल्या होत्या, त्यातील एक तोफ तोफ अतिशय अरूंद ठिकाणी बुरूजावर पडलेली होती.या दोन्ही तोफांना आता मोकळा श्वास घेता येत आहे.सहा फुट लांबीच्या आणि साधारणातः एक हजार किलो वजनाच्या या तोफा तरूणांच्या एका चमुने बाहेर काढल्या.त्यामुळे या तोफांचे आयुष्य आता वाढणार आहे.त्याचे शिवप्रेमींनी स्वागत केले आहे.–