तेलंगणा मधील पत्रकारांना आता राज्य सरकारच्या कर्मचार्याप्रमाणे हेल्थकार्ड देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.ही स्वागतार्ह गोष्ट असली तरी सरकारनं हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचा फोटोला पत्रकारांनी दुधानं अभिषेक करावा ही मात्र लाजीरवाणी गोष्ट आहे.पत्रकार भिक मागत नाहीत,हक्क मागतात.अशा स्थितीत पत्रकाराची एखादी मागणी सरकारनं मान्य केली तर ते सरकार पत्रकारांवर उपकार करीत नाही.त्यामुळे तेलंगणातील पत्रकारांचा मुख्यमंत्र्यांच्या अभिषेकाचा प्रकार लाचारीचं दर्शन घडविणारा आहे.