निकृष्ट बांधकामाची बातमी का दिलीस म्हणून ठेकेदार आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या चिथावणी वरून पत्रकाराला केली बेदम मारहाण.
दैनिक सामानाचे तेर चे वार्ताहर विजय कानडे यांना तेरच्या गाव गुंडांनी केली मारहाण
दैनिक सामना मध्ये बातमी प्रकाशित झाल्यावर, त्याच रात्री 12 वाजता पत्रकार कानडे यांच्या मोबाईल वर “लवकरच तुला या बातमीचे बक्षीस देतो” म्हणून पाठवला होता धमकीचा sms.
रात्री धमकी देऊन सकाळी 10 वाजता झाली काठीने जबर मारहाण.
8888365511 या मोबाईल क्रमांकावरून पत्रकार कानडे यांना रात्री 11.56 वाजता आला, धमकीचा sms(सोबत sms चा मोबाईल स्क्रीन फोटो)
हा मोबाईल तेर येथील राष्ट्रवादी चे कार्यकर्ते बालाजी पांढरे यांचा असल्याचे झाले उघड
काठीने केलेल्या मारहाणीत पत्रकार विजय कानडे यांच्या पाठीवर पायावर, कानावर असंख्य जखमा.(सोबत जखमांचे फोटो)
आरोपीने काठीने बेदम मारहाण केली असतानाही ढोकी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरोधात या पूर्वी केला होता फक्त अदखलपात्र गुन्हा(NC).
तसेच Sms करून पत्रकाराला धमकी देणारा तेर येथील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, ठेकेदार बालाजी पांढरे वर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती .
उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या निवेदना नंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ढोकी पोलिसांना दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश.
त्यामुळे पत्रकाराला मारहाण करणारा आणि त्याला चिथावणी देणारा आरोपी च्या विरोधात ढोकी पोलीस स्टेशन ला विविध कलम अन्वये गुन्हा केला नोंद
त्यानुसार आरोपी किसन कानडे, बालाजी पांढरे यांच्या विरोधात गुन्हा क्रमांक 91 /2016, भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे ढोकी पोलीस स्टेशन ला गुन्हा केला दाखल
तेर येथे दलित स्मशानभूमीचे बांधकाम निकृष्ट झाले असल्याची तक्रार गावक-यांनी जिल्हाधिकार्यांना केली होती.
बांधकाम निकृष्ट झाले असल्याचा ग्रामपंचायत ने केला होता पंचनामा.
या निवेदनाची बातमी दैनिक सामना मध्ये प्रकाशित होताच ठेकेदार आणि त्याच्या नातेवाईकांनी केली होती पत्रकार विजय कानडे यांना मारहाण