ढेपेंवरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता

0
722

सुनील ढेपे यांना आनंद नगर पोलिसांनी बसवून ठेवले आहे.त्यांच्याकडील मोबाईल पोलिसांनी काढून घेतला असून त्यांचा कोणाशी संपर्क होऊ दिला जात नाही.माहिती अशी मिळते आहे की,ज्या महिलांनी हल्ला केला त्यांच्यावतीने ढेपेंच्या विरोधात तक्रार दिली जात आहे त्यामुळे पोलिस ढेपेंवरच गुन्हा दाखल करू शकतात.हा विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला गेला आहे.ज्यांंना शक्य असेल त्यानी पुन्हा मुख्यमंत्र्यांना बोलल्यास ढेंपेना मदत होऊ शकेल.कोणत्याही परिस्थिती गुन्हा दाखल होणार नाही याची काळजी आपणास घ्यावी लागेल.बातमी दिल्यामुळे जर पत्रकारांवरच गुन्हे दाखल होणार असतील तर हे गंभीर आहे आणि त्यातून काळ सोकावत जाणार आहे.त्यामुळे सर्वानीच हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज आहे.तशी माझी विनंती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here