झारखंडमध्ये पत्रकारांची हत्या

पाटणा, १४ मे, (हिं.स.) बिहार व झारखंडमध्ये गेल्या चोवीस तासात दोन पत्रकारांची हत्या झाली आहे. बिहारच्या सीवानमध्ये ‘हिंदुस्तान’ या हिंदी वृत्तपत्राचे वरिष्ठ पत्रकार राजदेव रंजन यांची रेल्वे स्थानकाजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

झाडखंडमध्ये चतरा जिल्ह्यातील एका वृत्त वाहिनीचे पत्रकार अखिलेश प्रताप सिंह यांचीही काल गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंचायत सचिवालयाजवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेबद्दल झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी खेद व्यक्त केला असून पोलीस महासंचालक डी.के.पांडे यांना हल्लेखोरांना लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहे.

LEAVE A REPLY