ज्येष्ठ पत्रकार,विचारवंत आणि लेखक मुझफ्फर हुसेन गेल्याची बातमी धक्का देणारी आहे.अलिबागला असताना अनेकदा त्यांचा माझा सपर्क व्हायचा.मला आठवतंय माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशनही हुसैन यांच्या हस्ते झाले होते.नंतरही पत्रकार दिन आणि अन्य कार्यक्रमांना त्याना निमंत्रित केलं होतं.त्यानंतरही आमचा संपर्क सुरू होता.मात्र गेली दोन-तीन वर्षे संपर्क नव्हता.आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली आणि एका ज्येष्ठ पत्रकाराला आपण गमविल्याची खंत वाटायला लागली.78 वर्षांच्या मुझफ्फर हुसैन याचं पवईच्या हिरानंदानी रूग्णालायत निधन झालं.उद्या त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले जाणार आहेत.
20 मार्च 1940 रोजी जन्मलेले मुझफ्फर हुसेन विचारवंत तर होतेच पण ते फर्डे वक्तेही होते.हिंदी भाषेवर त्यांचे एवढे प्रभूत्व होते की,त्यांची भाषणं ऐकत राहवित असे वाटे.विविध दैनिकातील त्यांचं स्तंभलेखनही मनाचा ठाव घेणारं असे.मुस्लिम जगत हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता.मुस्लिम धर्मग्रंथाप्रमाणेच हिंदूंच्या धर्मग्रथांचाही त्यांचा अभ्यास होता.2002 मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान केला गेला होता.विविध मानसन्मान प्राप्त झालेल्या मुझफ्फर हुसेन यांनी इस्लाम व शाकाहार,मुस्लिम मानसशास्त्री,अल्पसंख्याक वाद,एक धोका,इस्लाम घर्मातील कुटुंब नियोजन लादेन-दङशतवाद आणि अफगाणीस्तान ,समान नागरी कायदा आदि त्यांची पुस्तकं प्रसिध्द झालेली आहे.
मुझफ्फर हुसैन यांना भावपूर्ण श्रध्दांजली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here