नांदेडः मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या व्दैवार्षिक निवडणुका यंदा प्रथमच ऑनलाईन पध्दतीनं होत असल्यानं जिल्हयातील पत्रकारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.या प्रक्रियेमुळं जिल्हयातील पत्रकारांना घरी बसल्या बसल्या मतदान करता येणार आहे.सर्व सदस्यांना एक लिंक एसएमएस व्दारे पाठविली जाईल ती ओपन केल्यानंतर सर्व उमेदवारांची नावे दिसतील,आपणास योग्य त्या उमेदवाराच्या समोर आपणास मतदान करता येईल.रिमोट भागात आणि जेथे नेटवर्कच्या प्रश्‍न आहे अशा ठिकाणच्या पत्रकारांना मात्र तालुक्याच्या ठिकाणी किंवा जेथे इंटरनेट नेटवर्क आहे अशा ठिकाणी येऊनच लिंक ओपन करून मतदान करावे लागणार आहे.पुणे जिल्हयात ऑनलाईन पध्दतीनं निवडणुका झाल्या होत्या.तेथे ज्या अडचणी आल्या त्या नांदेडमध्ये निवडणुका घेताना दूर केल्या जाणार असल्याचे परिषदेने जाहीर केले आहे..–
*द्वीवार्षीक निवडणूक कार्यक्रम*
मराठी पञकार परीषद ,मुंबई शी संलग्न नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचा द्वीवार्षीक निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहे
*जिल्हाध्यक्ष, ,जिल्हा सरचिटणीस, उपाध्यक्ष-2* *कोषाध्यक्ष* आणि 11 कार्यकारिणी सदस्य
*या चार पदा साठी अर्ज भरणे 15 फेब्रुवारी २०१८ ते 20 फेब्रुवारी २०१८ रोज सकाळी ११-०० ते ३-००*
*छानणी* -*21 फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी ५-००*
 
*अर्ज परत घेणे**22फेब्रुवारी २०१८सकाळी ११-०० ते३-००*
*अंतीम उमेदवार यांदी प्रकाशीत करणे**23फेब्रुवारी२०१८ रोजी दुपारी ५-००*
*मतदान दि.२८फेब्रुवारी २०१८* आॕनलाईन पध्दतीने सकाळी ९-०० ते दुपारी ४-००* या वेळेत सर्व सभासदाना आॕनलाईन पध्दतीने मतदानाचा हक्क बजावता येईल
*निकालाची घोषणा २८फेब्रुवारी रोजी दुपारी 6वाजता
या निवडणूकीचे
*निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून
-जुगलकिशोर धूत हे काम पाहतील( 9422870475) त्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजकुमार कोटलवार (989006963) सहकार्य करतील.
त्यांना सर्व कार्यालयीन सहकार्य सध्याचे अध्यक्ष प्रकाश कांबळे आणि सरचिटणीस नरेश दंडवते हे करतील. अर्थात निवडणूक कामात कांबळे आणि दंडवते यांचा कुठलाही हस्त क्षेप राहणार नाही. निवडणूक कार्यालय…. दैनिक गाववाला, शिवाजीनगर नांदेड येथे राहील
या निवडणूकीचे परीषदे कडून निरीक्षक म्हणून – परीषदेचे उपाध्यक्ष विजय दगडू हे काम पाहतील.
सर्व सभासदानी हा निवडणूक कार्यक्रम शांततेत संपन्न करण्या साठी सहकार्य करावे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*अनिल महाजन*
सरचिटणीस
मराठी पत्रकार परिषद, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here