जिल्हाधिकाऱ्यांच्या इशारा

0
659

मान्सून काळात रायगड जिल्हयात दरडी कोसळणे,महापूर,भरतीचे पाणी परिसरात घुसणे अपघात आदि प्रकार घडतात.या नैसर्गिक आपत्तींना तोंड देता यावे यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या प्रय़त्नांचा एक भाग म्हणून कोणत्याही अधिकाऱ्यांने पूर्वसंमती शिवाय मुख्यालय सोडू नये असे आढळून आल्यास संबंधित अधिका़ऱ्यावर कठोर कारवाई कऱण्यात येईल असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिला आहे.

जिल्हयातील प्रत्येक कार्यालयानं आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून तो 20 मे पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा असे आदेशही देण्यात आले आहेत.
सुमंत भंागे यांच्या अध्यक्षतेखाली आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली.
मान्सून काळात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांत समन्वय असला पाहिजे,सर्व विभागांनी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास द्यावी,प्रत्येक विभागाचा नियंत्रण कक्ष 1 जून ते 15 ऑक्टोबर या काळात चोवीस तास कार्यान्वित असावा असे आदेशही देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here