2016 च्या पहिल्या सहा महिन्यात जगात 28 पत्रकारांच्या हत्त्या झाल्या असून त्यातील 17 प्रकरणातली कारणं समजलेली आहेत,तर दहा प्रकरणात खून नेमके कश्यामुळे झाले हे स्पष्ट झालेले नाही.कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट या पत्रकारांसाठी काम करणार्या संस्थेनं ही माहिती दिली आहे.भारतातील दोन पत्रकारांची हत्त्या झाल्याची माहितीही संस्थेनं दिली आहे. अन्य देशातील आकडेवारी अशी .येमेन3,सिरिया 3,टुर्की 2,अफगाणीस्तान 2,इराक 2 ,लिबिया 2,मेक्सिको 1,आणि अन्य एक अशी आहे.जे पत्रकार मारले गेले आहेत त्यातील 18 टक्के पत्रकार भ्रष्टाचार विषयक बातम्या देणारे होते,क्राईम बिट पाहणार्या पत्रकारांची संख्या 12 टक्के होती,12 सांस्कृतिक,18 ह्युमन राईट, 41 टक्के पत्रकार राजकीय बिट पाहणारे आणि 71 टक्के युध्दाचे वार्तांकन करणारे होते असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.भारतात ज्या दोन पत्रकारांची हत्त्या झाली त्यांची नावे अशी
1) राजदेव रंजन (हिंदुस्तान) 13 मे 2016 बिहार
2) करूण मिश्रा ( जनसंदेश टाइम्स ) सुलतानपूर उत्तरप्रदेश दिनांक 13 फेब्रुवारी 2016