अलिबागः महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनार्‍यावरील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर आजपासून कायमस्वरूपी तिरंगा ध्वज फडकत राहणार आहे.आज सकाळी खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि विविध राजघराण्यांचे प्रतिनिधी आणि मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित होते.मुरूड जंजिरा किल्लायावर कायमस्वरूपी तिरंगा फडकत राहावा अशी मागणी विविध संघटनांच्यावतीने करण्यात येत होती.आज अखेर ही मागणी मान्य झाली असून आता जंजिर्‍यावर तिरंगा डौलानं फडकत राहणार आहे.ध्वजारोहण झाल्यानंतर शिवप्रेमींनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा जयजयकार केला.
यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे भोसले यांनी सर्वच गडकिल्ले आणि जलदुर्गावर तिरंगा फडकत राहिला पाहिजे अशी मागणी केली.जंजिर्‍यावर तिरंगा फडकवून आम्ही खर्‍या अर्थानं महाराजांसमोर नतमस्तक झालोत अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
अजिंक्य अशी ओळख असलेल्या हा किल्ला 22 एकरावर परसलेला आहे.22 बुरूज असलेल्या या किल्लयावर 572 तोफा आहेत.अरबी भाषेत जझिरा म्हणजे बेट..पुढे या जझिराचा अपभ्रंश जंजिरा असा झाला.या किल्ल्यावर दीर्घकाळ सिद्दी नबाबाची राजवट होती.देश स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल साडेपाच महिन्यांनी 31 जानेवारी 1948 रोजी जंजिरा हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here