चवदार तळे सत्यागृहाचा 87वा वर्धापनदिन

0
2185
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या  समतेच्या लढ्यात महाडच्या चवदार तळे सत्यागृहाला अनन्यसाधारण महत्व असल्यानेच या घटनेचा उल्लेख महाडचा धर्मसंगर असाच केला जातो.
अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पानवठे आणि तलाव,विहिरी खुल्या कऱण्यासंबंधीचा सी.के.बोले यांचा एक ठराव विधिमंडळानं संमत केला होता.मात्र या ठरावाची अंमलबजावणी स्थानिक संस्थेनं करायची होती.त्यानुसार महाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुरबानान टिपणीस यांनी देखील गावातील सर्व पानवटे सर्वांसाठी खुले करण्याचा ठराव 5 जानेवारी 1924 रोजी पालिकेत मंजूर करून घेतला होता.प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नव्हती.याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेचं रायगड जिल्हयाचं अधिवेशन 19 आणि 20 मार्च रोजी महाडला घ्यायचं ठरलं.या अधिवेशनासाठी 2500 लोक उपस्थित होते.परिषदेत 33 ठराव मंजूर झाले.परिषदेचा समारोप करताना अनंतराव चित्र यांनी “आपण चवदार तळ्यावर जावू आणि तेथील जल प्राशन करू” अशी सूचना मांडली.त्यानुसार डॉ.बाबासाहेब आंबडकरांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते चवदार तळ्यावर गेले आणि तेथील जलप्राशन केले.हा दिवस होता 20 मार्चचा.या दिवसाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी लाखो भीमसैनिक महाडच्या क्रांती भूमीत अभिवादन करण्यासाठी येतात.यावर्षी चवदार तळ्याचा 87 वा वर्धापन आज साजरा होत असून त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.येणाऱ्या  कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून महाड नगरपालिकेने सारी व्यवस्था केल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक झिजाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here