ग्रामसेविका निलंबित।

0
663

आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी न करणाऱ्या नागोठणे येथील ग्रामसेविका ए.ए.नागे यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित कऱण्यात आले आहे.विस्तार अधिकारी यशवंत गायकवाड यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई कऱण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांनी आज दिले आहेत.

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध पक्षांच्या वतीने लावण्यात आलेले बॅनर्स संबंधित यंत्रणांनी तातडीने काढून टाकण्याचे आदेश देण्यात आलेले होेते.नगरपालिका स्तरावर मुख्याधिकारी तर ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांकडे ही जबाबदारी दिली गेलेली होती.असे असतानाही नागोठणे येथील शिवाजी चौकात राजकीय पक्षांनी लावलेले बॅनर्स कायम होते.यासंबंधितीच्या बातम्यांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिका़ऱ्यांनी दखल घेत ग्रामसेविकेवर निलंबनाची कारवाई केली आहे.संबंधित ग्रामसेविकेवर गुन्हा दाखल कऱण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.रायगड जिल्हयातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.
दरम्यान आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात कुचराई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कडक कारवाई कऱण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भागे यांनी दिले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here