गेवराई तालुका मराठी पत्रकार संघाला यंदाचा उत्कृष्ठ तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार दिला गेला आहे.. राज्यात “नंबर वन” काम करणारया या संघाला भेट देण्याची इच्छा होती.. माझ्या व्यक्तीगत कामासाठी मी, माझे बंधू, आदर्श शेतकरी कल्याण कुलकर्णी, डोंगरचा राजा चे संपादक अनिल वाघमारे असे आम्ही तिघे काल गेवराईला गेलो होतो.. दौरा खासगी असल्याने कोणाला बोललो नव्हतो पण पत्रकार आहेत म्हटल्यावर माझ्या दौरयाचा पत्रकार मित्रांना सुगावा लागलाच..मग सारेजण मी जेथे थांबलो होतो तेथे माझ्या भेटीला आले..आम्हाला हककानं पत्रकार भवनात घेऊन गेले..तेथे आपलेपणाने आमच्या तिघांचाही सत्कार केला.. छान वाटलं.. पत्रकारिता करतानाच सामाजिक बांधिलकी जपत आणि स्वतःचे व्यवसाय करीत ही सारी मंडळी काम करतेय हे पाहून आनंद वाटला.. ज्या उद्देशानं मराठी परिषदेनं पत्रकारांची राज्यव्यापी चळवळ उभी केली आहे तो उद्देश तालुका आणि गाव पातळीपर्यंत पोहोचल्याचे पाहून आनंद वाटला.. यापेक्षा अधिक मला काय हवंय.? . या मंडळींबरोबर जेवण घेताना आणि गप्पा मारताना अनेक नवे विषय, नवे प्रश्न मला कळले.
.तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, प़ा. राजेंद्र बरकसे, अय्युब बागवान, सुभाष सुतार, भागवत जाधव, प़साद कुलकर्णी.. तुम्हा सर्वांबरोबर दिवस आनंदात गेला ..सर्वांचे आभार..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here