सिर्फ नाम ही काफी है!

0
815

रायगड प्रेस क्लब.. सिर्फ नाम ही काफी है..

रायगड प्रेस क्लब ही उपक़मशील पत्रकारांची कौतूक करावी अशी संस्था आहे.. पत्रकार आणि समाज हिताचे अफलातून कार्यक्रम रायगड प्रेस क्लबच्यावतीनं सातत्यानं राबविले जातात.. या कार्यक्रमात नाविन्य जसे असते तसेच त्यात सातत्यही असते..
१जुलै रोजी कृषी दिन असतो.. आपण सारे सोशल मिडियावरून शेतकरयांना शुभेच्छा देऊन मोकळे होतो.. रायगडच्या पत्रकारांना अशा कोरड्या शुभेच्छा मान्य नसाव्यात.. रायगडमध्ये शेतीत नाविन्यपूर्ण प़योग करणारे असंख्य शेतकरी आहेत.. त्यांची कोणी दखल घेत नव्हतं.. रायगड प्रेस क्लबने अशा वेगळ्या वाटेनं जाणारया शेतकरयांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा निर्णय घेतला.. हे करताना पारंपारिक कार्यक्रमांना फाटा देत थेट शेतकरयांच्या बांधावर जाऊन त्याचा मानपत्र, शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतला.. गेली दहा वर्षे अखंडपणे हा उपक्रम सुरू आहे.. जिल्हयातील 14 तालुक्यातील प्रेस क्लबचे पदाधिकारी शेतावर जातात, शेतकरयांचं कौतूक करतात..जया शेतकरयांचा सन्मान झाला त्या शेतकरयांने शेतीत कोणते नवे प़योग केले याची माहिती देणारी स्मरणिका काढली जाते.. प़त्येक तालुक्यातून दोन असे २८ शेतकरी दरवर्षी सन्मानित होतात.. दरवर्षी हा कार्यक्रम एकाच दिवशी १४ तालुक्यात होतो.आज कर्जत तालुक्यातील अशोक पाटील आणि हरिश्‍चंद्र काळण या शेतकरयांना सन्मानित केले गेले.. त्यावेळच्या छायाचित्रात कर्जतचे पत्रकार दिसत आहेत..
पत्रकारांबददल नाकं मोडणारे हितसंबंधी अनेक आहेत.. पण जे चांगलं करतात त्यांना चांगलं म्हणण्याची दानत फारच थोड्या मध्ये असते.. अनेकजण असंही म्हणतात हे काय पत्रकाराचं काम आहे का? मी म्हणतो हो, जे समाजहिताचं आहे ते सारं पत्रकारांचं काम आहे..
रायगडच्या पत्रकारांचं अभिनंदन आणि आभार..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here