क्रिकेट पंच विजय कदम यांचा सत्कार

0
1074
क्रिकेट पंच विजय कदम यांचा सत्कार माथेरान मध्ये विविध क्रिकेट स्पर्धांमधून पाचशे हून अधिक सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करणारे विजय गंगाराम कदम यांचा किशोर क्रिकेट संघाच्या वतीने सत्कार कारण्यात आला . गेली चाळीस वर्षे किशोर क्रिकेट संघाच्या वतीने माथेरान मध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते . मुंबई पुणे या सह महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात . या स्पर्धेच्या निमित्ताने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले . माथेरान चे नगराध्यक्ष अजय सावंत आणि माजी नगराध्यक्ष दिलीप गुप्ता यांच्या उपस्थितीत विजय कदम यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . के सी एस चे सुनील शिंदे अनिस शेख अनिल गायकवाड रमेश जोशी अनंत केतकर नगरसेवक शिवाजी शिंदे चंद्रकांत जाधव दळवी दीपक जाधव दिनेश सुतार यासह अनेक नगरसेवक खेळाडू आणि क्रिकेट प्रेमी नागरिक या वेळी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here