कोकण रेल्वेच्या रोह्यापर्यंतच्या दुपरीकरणाचे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल असा विश्‍वास मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कोकण रेल्वेचा मार्ग एक पदरी असल्याने वाहतुकीस विलंब तर होतोच त्याच बरोबर वाहतुकीस सातत्यानं व्यत्यय येतो.त्यामुळे 11 हजार कोटी रूपये खर्च करून रेल्वे मार्गाचे दुपरीकरण केले जात आहे.पहिल्या टप्प्यातील पनवेल ते पेण मार्गाच्या दुपरीकरणाचे 270 कोटी रूपयांचे काम पूर्ण झाले आहे तर पेण ते रोहा मार्गाचे 370 कोटी रूपये खर्चाचे काम नागोठणे ते रोहा या टप्प्यात अपूर्ण आहे.जागेचे प्रकरण कोर्टात गेल्याने हे काम रखडले असले तरी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.कोकण रेल्वे मार्ग दुहेरी झाल्यानंतर रोह्या पर्यतच्या वेळेत पंधरा मिनिटांची बचत होणार आहे.सध्या दिवा ते रोहा हे अंतर कापण्यासाठी एक्स्प्रेस गाड्यांना दोन तास लागतात.-

LEAVE A REPLY