पत्रकार लढले,पत्रकार यशस्वी झाले

0
836

कोकणातील जनतेसाठी एक खूषखबर आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला आता वेग येणार असं दिसतंय.कारण 24 ऑगस्ट रोजी हातखंबा येथे चौपदरीकऱणाच्या कामाचा शुभारंभ होत आहे.हे काम दोन्ही बाजुंनी एकाच वेळेस सुरू होणार अशी चर्चा आहे.चौपदरीकरणाचा पहिला टप्पा रायगड जिल्हयात पळस्पे ते इंदापूर यापुर्वीच सुरू झालेला आहे.त्याचं काम वेगात सुरू आहे.

कोकणातील पत्रकारांनी रायगड प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली सतत पाच वर्ष रस्तयावर उतरून लढा दिला होता.शांततेच्या मार्गानं आंदोलन केल्यानंतर सरकारला याची दखल घेणे भाग पडले.अखेरीस पहिल्या टप्पयाचं काम सुरू झालं.आता पुढील टप्प्याचंही काम सुरू होत आहे.त्यासाठी 8 हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
स्वातंत्र्य लढा असो की,महाराष्ट्र सीमा आंदोलन असो या लढ्यात पत्रकारंाची भूमिका महत्वाची होती.त्यानंतर पत्रकारांनी एखादा विषय हाती घेतला,त्यासाठी रस्त्यावर उतरून सतत लढा दिला असे एकमेव उदाहरण म्हणून मुंबई-गोवा महामार्गासाठीच्या पत्रकारांच्या लढ्याकडं पाहिलं जात आहे.पत्रकरा आंदोलन करीत होते तेव्हा सारेच पक्ष दुर्लक्ष करीत होते.आज श्रेय घेण्यासाठी सारेच पक्ष उताविळ असले तरी कोकणातील जनतेला मात्र हा रस्ता पत्रकारांमुळेच होतोय याची जाणीव आहे.

दुसऱ्या टप्पयाचं काम लवकर सुरू व्हावं यामागणीसाठी 25 जून रोजी कोकणातील 300 पत्रकारांनी कशेडी घाट रोको आंदोलन करून स्वतःला अटक करून घेतली होती.या आंदोलनाची नितीन गडकरी यांनी दखल घेत त्याच दिवशी चौपदरीकरणाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू कऱण्याची घोषणा केली होती.ती आता पुर्ण होत आहे.कोकणातील हा एकमेव महामार्ग चौपदरी झाल्यास खऱ्या अर्थानं काकोणाच्या विकासाला गती मिळणार आहे आणि रस्त्यावरील अपघातांचं प्रमाणही कमी होणार आहे.सध्या या महामार्गावर दररोज सरासरी दोन जणांचा मृत्यू आणि किमान पाच जणं गंभीर जखमी होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here