के इएमच्या डॉक्टरांची हरामखोरी,
पत्रकाराच्या वडिलांची अक्षम्य हेळसांड,पैश्याची मागणी
ही स्टोरी आहे ठाण्यातील एका तरूण पत्रकाराची.निकित शार्दूल असं या पत्रकाराचं नाव आहे.जय महाराष्ट्र वाहिनीसाठी तो काम करतो.मध्यमवर्गीय.घरात एकटाच कमविता.सर्वसाधारण पत्रकाराच्या घरातली जी अवस्था असते तशीच शार्दुलची.त्यातच नवं संकट आलं.वडिलांनी अपघात झाला.ठाण्यात डॉक्टरांनी सांगितलं पाय कापावा लागेल.केइएममध्ये घेऊन जा.केइएममध्ये नेलं तिथले डॉक्टर भारीच हरामखोर निघाले.अगोदर सात तास अॅडमिटच करून घेतलं गेलं नाही.अॅडमिट झाल्यावर शार्दुलकडं दहा हजार रूपये मागितले गेले.ते जो पर्यंत भरत नाहीत तोपर्यंत ऑपरेशन होणार नाही दम दिला गेला. .ही बातमी पत्रकार विनोद जगदाळे याना समजली.त्यानी डीन आणि संबंधित डॉक्टरांची कानउघाडणी केली. किरण नाईक देखील डीन यांच्याशी बोलले .परंतू काही उपयोग झाला नाही.शार्दुलची धावपळ सुरू होती.वडिल बेडवर तळमळत पडले होते.पैसे आणा मगच ऑपरशेन अशी अरेरावी सुरू होती.अखेर शार्दुलनं आज काही रक्काम डॉक्टरांच्या हातावर टेकविली देखील.पण पूर्ण रक्कम द्या असा तगादा डॉक्टरांनी लावला.त्यासाठी शार्दुलच्या आईलाही डॉक्टर अव्दातव्दा बोलले.शार्दुलकडे राजीव गांधी जीवनदायी योजनेचं कार्ड आहे ,तरीही हे पैसे कश्यासाठी मागितले जात आहेत हे समजत नाही.शासकीय रूग्णालयात पत्रकारांना मोफत उपचार मिळतील अशा थापा सरकार मारते.प्रत्यक्षात येणारा अनुभव जीवघेणा असतो.सोमवारी आम्ही पंधरा वीस जण जाऊन डॉ.सुपेंना हे पैसे कश्यासाठी द्यायचे असे विचारणार आहोत.मुंबईतील पत्रकारांपैकी कोणी यासंदर्भात शार्दुलला काही मदत करू शकत असतील तर शार्दुलचा नंबर असा आहे. ९८६७२४६४९२ ( केइएमचे डीन डॉ.सुपे यांचा नंबर ९८२०७०३१९१ असा आहे.) त्याला मदतीची गरज आहे.प्लीज मदत करा-