केजमध्ये साकारतंय पत्रकार भवन

0
749

kaj2

राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील पत्रकारांची वाढती संख्या विचारात घेऊन सरकारने प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवनासाठी जागा आणि निधी द्यावा अशी आपली मागणी आहे.ही मागणी सरकार स्वभावानुसार अजून मान्य करीत नसले तरी राज्याच्या अनेक तालुक्यातील पत्रकार संघ आपल्या हिंमतीवर आणि पत्रकारांच्या एकजुटीच्या बळावर पत्रकार भवनाच्या इमारती उभ्या करीत आहेत.पुणे जिल्हयातील मुळशीत अद्ययावत पत्रकार भवन उभं राहिल्याचं आपणास माहिती आहेच.आता बीड जिल्हयातील माजलगाव .वडवणी ( हा नवा तालुका आहे) पाठोपाठ केजमध्येही पत्रकार भवन उभे राहिले आहे.केज पत्रकार भवनाच्या अंतर्गत सजावटीचं काम आता सुरू आहे.केजच्या एका पत्रकार मित्रानं या संबंधीची माहिती आणि फोटो शेअर केले आहेत.शहरातील एखाद्या धनिकाकडून जागा मिळवायची आणि खासदार,आमदारांकडून त्यांच्या फंडातून निधी मिळवून पत्रकार भवन उभं करायचे प्रयत्न आता सर्वत्र होताना दिसत आहेत.केज मधील तमाम पत्रकारांचे अभिनंदन आणि दाखविलेल्या एकजुटीबद्दल आभार.

केजच्या मित्रानं पाठविलेली बातमी

केज तालुका सक्रिय पत्रकार संघाच्या पत्रकार भवनाला आता छान व सुरेख असा आकार मिळाला असून आता भवनाच काम अंतिम टप्प्यात आल आहे. आपल्या ग्रुपमधील अनेकांनी आर्थिक मदत करून मोठं सहकार्ये केलं व यामुळंच हे सुंदर अस “पत्रकार भवन” केज मध्ये उभं राहत आहे. आज मधलं काम संपल फोरमाईक मध्ये केलेलं हे काम अतिशय सुंदर करण्यात आल आहे. आता मधले फर्निचर यामध्ये कुशन चे सोफे, कुशनच्या खुर्च्या, कॉंप्युटर, LED टी.व्ही, काचेचा दरवाजा, लाईट फिटिंग हे काम व इतरही काही काम बाकी आहेत त्यामुळं थोडा अवधी व निधी तर लागेलच मात्र आपण सर्वांनी केलेलं सहकार्ये याशिवाय हे शक्य नव्हतं व आणखी आपल्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही.
          सक्रिय पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी खरोखर मनातून आपला वेळ व मेहनत खर्च करून प्रत्येकाने हे भवन उभारणीच्या कामात आपलं योगदान दिल आहे विशेष म्हणजे आमचे माजी अध्यक्ष रामदासजी तपसे यांनी देखील मोठी मेहनत घेऊन काम करून घेतलं व त्यांची धुरा आता विनोद शिंदे संभाळत आहेत तर याच बरोबर आमचे सचिव तथा जेष्ठ पत्रकार सुंदर नाईकवाडे, यांच्यासह आम्ही सर्व सदस्य अगदी मनातून यामध्ये गुंतलो आहोत आता लवकरात लवकर हे काम संपवून आपल्या सर्वांच्या साक्षीने या भवनात आम्हाला “भवन प्रवेश” करायचा आहे तेव्हा काही दिवसात आम्ही अधिकृत पणे आपणाला निमंत्रण देऊच
धन्यवाद !!!
                                आपला विश्वासू
                                संतोष सोनवणेs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here