जागतिक बँकेच्या मदतीनं मुंबई,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि पालघर या किनारी जिल्हयात 398 कोटींचा राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प राबविण्यात येत आहे.मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केल्यानंतर रायगडमधील यंत्रणा कामाला लागली आहे.
रायगड जिल्हयात या प्रकल्पांतर्गत चक्रीवादळ निवारा केंद्र,समुद्र उधाण प्रतिबंधक योजना,खार बांधबदिस्ती,आणि अलिबाग शहरातील भूमिगत वीज वाहिनीच्या अंतिम मंजुरीपुर्वी त्याची पाहणी कऱण्यासाठी जागतिक बँकेचे शिष्टमंडळ येत्या रविवारी रायगड जिल्हयाच्या दौर्यावर येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिली.जिल्हयातील दहा किनारी भागात चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार असल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.–