मुरूड पालिकेची मागणी 

0
703
समुद्र सुरक्षा आणि पर्यटन विकासासाठी विशेष आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी मुरूड जंजीरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अशोक धुमाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.किनार्‍यावर गोएन्स बंधारे बाधण्याची गरज मुख्यमत्र्यांना पाठविलेल्या पत्रात कऱण्यात आली आहे.या बंधार्‍यांमुळे समुद्रातील धोकादायक भोवरे नष्ट होऊन किनारे पूर्णतः सुरक्षित होतील.शिवाय मच्छिमार बोटींना भरतीपर्यंत वाट पाहण्याची गरज भासणार नाही.तवसाळकरवाडीपासून दुर्घटनाग्रस्त जागेपर्यंत पूर्व-पश्‍चिम असा बंधारा झाला तर नैसर्गिक खाडीमुखाचा भाग खोल आणि सुरक्षित होईल असे पत्रात नमुद कऱण्यात आले आहे.शिवाय अडीच किलो मिटरच्या किनारपट्टीवर टेहळणी मनोरे,कायमस्वरूपी जीवरक्षकाची नेमणूक,किनारा सुशोभिकरण,किनारा धुपप्रतिबंधक किनारा यासाठी शासनाने विशेष आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी कऱण्यात आली आहे.शिवाय एमटीडीसीचा रेस्क्यू बीच प्रकल्प गेली अनेक दिवस रखडला आहे.त्यासाठीही निधी देण्याची मागणी केली जात आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here