कासवांचं अस्तित्व धोक्यात

0
856

अलिबाग- दुर्मिळ जातीची मृत कासवं मुरूडच्या किनाऱ्यावर वाहून येण्याच्या घटना सतत घडत असल्याने कासवमित्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.मुरू डनजिकच्या दिघी बंदरात मोठया जहाजांची सातत्यानं ये-जा सुरू असते अशा जहाजांचा किंवा बोटींचा पंखा लागून कासवं जखमी होऊन मृत होतात.काही वेळा समुद्रात फेकलेल्या निकामी जाळ्यामुळेही कासव आणि डॉल्फिन त्यात अडकून मृत झाल्याच्या घटना घडल्याचे आढळून आले आहे.जलपदूषणाचा फटकाही कासवांना बसत आहे.
कासवं अंडी देण्यासाठी किनाऱ्यावर येतात.मात्र ही अंडी चोरण्याच्या घटना मध्यंतरी उघडकीस आल्यानंतर मुरूडमधील काही निसर्गप्रेमींनी मुरूडच्या किनाऱ्यावर कासव संवर्धन प्रकल्प राबविला होता.या प्रकल्पांतर्गत कासवाची पिले यशस्वीपणे समुद्रात सोडण्यात आली होती.मात्र अलिकडे कासवांची संख्या कमी झाल्याने एकही कासव अंडी देण्यासाठी मुरूडच्या किनाऱ्यावर येत नसल्याचे सांगितले जाते.अशा स्थितीत कासव संवर्धनासाठी शासकीय पातळीवर प्रय़त्न करण्याची गरज कासवप्रेमी व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here